महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

भारतीय वायुदलाचा ब्राईट स्टार-23 युद्धसरावात सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – इजिप्तच्या कैरो (पश्चिम) हवाई तळ इथे 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2023 दरम्यान होत असलेल्या ब्राईट स्टार-23 या द्वैवार्षिक बहुस्तरीय त्रिसेवा युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय वायुदलाच्या (IAF)  तुकडीने आज उड्डाण केले.

भारतीय वायुदल पहिल्यांदाच ब्राईट स्टार-23 मध्ये सहभागी होत असून यात अमेरिका, सौदी अरेबिया, ग्रीस आणि कतारच्या तुकड्याही सहभागी होत आहेत. भारतीय वायुदलाच्या तुकडीत पाच MiG-29, दोन IL-78, दोन C-130 आणि दोन C-17 विमानांचा समावेश आहे. भारतीय वायुदलाच्या गरुड विशेष दलाचे जवान तसंच 28, 77  78 आणि 81 या तुकड्यांमधील जवानही या युद्धसरावात सहभागी होत आहेत. भारतीय लष्कराच्या दीडशे जवानांनाही आपल्या सोबत घेऊन भारतीय वायुदलाचे परिवहन विमान उड्डाण करणार आहे.

या युद्धसरावाचा उद्देश हा संयुक्त कसरतींचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी घडवून आणणे हा आहे. सीमेपलीकडल्या देशांमध्ये परस्पर संबंध स्थापित करण्यासोबतच सहभागी देशांचे धोरणात्मक संबंध या कसरतींमुळे दृढ व्हायला सहाय्य मिळणार आहे. भारतीय वायुदलाची सरावासाठी परदेशात उड्डाण करत असलेली तुकडी ही वायुदलाच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या समकक्ष मानली जात आहे.

भारत आणि इजिप्त मध्ये या आधीही 1960 दरम्यान दोन्ही देश हवाई इंजिनाचा आणि विमानाचा विकास करत असताना विशेषत्वाने संबंध आणि प्रगाढ सहकार्य प्रस्थापित झाले होते. त्यावेळी, इजिप्तच्या वैमानिकांना भारतीय समकक्ष वैमानिकांनी प्रशिक्षणही दिले होते. या दोन सुसंस्कृत देशांमधले नातेसंबंध नुकत्याच झालेल्या दोन्ही देशांच्या वायुदल प्रमुखांच्या भेटींमधून तसेच भारतीय संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांच्या इजिप्त भेटीनंतर आणखी प्रगल्भ झाले आहेत. या दोन्ही देशांनी त्यांच्या सशस्त्र दलांचे संयुक्त प्रशिक्षण नियमित युद्धसरावांच्या सहाय्याने आणखी मजबूत केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »