नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कर्नाटकात काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले असून या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचंड जल्लोषात विजयाचे स्वागत करण्यात येत आहे. कल्याण शहरात देखील शहर काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सर्वसामान्य जनतेने भाजपला दिक्षिणेत नाकारले असून काँग्रेस पक्षाचे राहूल गांधी हे आगामी लोकसभा निवडणूकी नंतर पंतप्रधान होतील ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष असेल असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे यांनी केले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी सचिन पोटे, सुरेन्रद आढाव, शकील खान, दशरथ पाटील, शैलेश खंडेवाल, मुन्ना तिवारी महिला पदाधिकारी कांचन कुलकर्णी, आदि सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अगामी काळात इतर राज्यात होणाऱ्या निवडणूकीत भाजपचे हार होणार असून भाजप मुक्त देश होईल. असा ही टोला या प्रसंगी भाजपला लगावला. कल्याण च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेल्या जल्लोषात ढोल ताशा ,फटाके व पेढे भरवित साजरा केला. कर्नाटक विजयाने देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये नवीन उर्जा संचारताना दिसली हि गोष्ट मात्र करी आहे
.