महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

केडीएमसीच्या सात प्रभागांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुमीत एलकोप्लास्टचा दिवाळी बोनस; २१ हजारांपेक्षा अधिक वेतनधारकांनाही लाभ

DESK MARATHI NEWS NETWORK
कल्याण/प्रतिनिधी- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागांमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा संकलनाचे काम करणाऱ्या सुमीत एलकोप्लास्ट कल्याण एसएमडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. कंपनीच्या वतीने आर्थिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक बोनस ४ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २१ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेत कंपनी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रुजू होण्याच्या तारखेनुसार आणि प्रत्यक्ष सेवाकालावधीनुसार बोनसची रक्कम निश्चित करून वितरित करण्यात आली आहे.
या बोनस वितरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, बोनसचा लाभ केवळ २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता त्यापेक्षा अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही देण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, बोनसचे वितरण बोनस देयक अधिनियम १९६५, वेतन संहिता २०१९ मधील लागू तरतुदी, कंपनीचे मंजूर धोरण आणि पात्रता निकष विचारात घेऊन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपली वेतन नोंद तपासून बोनसची रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करावी. काही तफावत किंवा शंका असल्यास कंपनीच्या मानव संसाधन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमीत एलकोप्लास्टमध्ये रुजू होण्यापूर्वी जे कर्मचारी अन्य कंपन्यांमध्ये कार्यरत होते, अशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागील कंपनीशी संपर्क साधून दिवाळी बोनसबाबत विचारणा करावी, असेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. संबंधित आर्थिक वर्षात सुमीत एलकोप्लास्टमध्ये कार्यरत असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वतीने बोनस देण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
कल्याण-डोंबिवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मेहनतीचा सन्मान आणि कर्मचारी कल्याणाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून बोनस वितरित करण्यात आल्याचे कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सात प्रभागांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात साजरी होण्यास मदत झाली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »