महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कल्याणमध्ये दिवाळी पहाट,१० नोव्हेंबरला रंगणार सुरांची मैफल

DESK MARATHI NEWS NEWTWORK.

कल्याण/प्रतिनिधी- भीषण दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातही आशेचा प्रकाश निर्माण व्हावा, या सामाजिक भावनेतून कल्याणमध्ये विशेष ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक सूर माणुसकीचा… बळीराजासाठी मदतीचा!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही सुरेल मैफल मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कल्याण पश्चिमेतील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदान येथे रंगणार आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टातून आपल्या घरातील चूल पेटते आणि त्यांच्या घामातून आपल्या ताटात अन्न येते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे आज अनेक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत बळीराजाच्या मदतीसाठी समाजाने एकत्र येण्याची गरज ओळखून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर आणि भाजप नगरसेवक शामल गायकर हे या कार्यक्रमाचे आयोजक असून नगरसेवक तथा जुने कल्याण शहराध्यक्ष अमित धाक्रस आणि नविन कल्याण भाजप शहराध्यक्ष स्वप्निल काठे यांनी निमंत्रक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी गायक हर्षवर्धन वावरे, ज्ञानेश्वर मेश्राम, आनंदी जोशी आणि भाग्यश्री देशपांडे आपल्या सुमधुर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती भागवत करणार आहेत.

विशेष म्हणजे, या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारी मदत धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे संगीताचा आनंद घेण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योगदान देण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच बळीराजाच्या मदतीसाठी सढळ हस्ते देणगी देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘सुरांची पहाट… माणुसकीची साथ… बळीराजाच्या मदतीसाठी एकजुटीचा हात!’ या भावनेतून साकारत असलेला हा उपक्रम यंदाच्या दिवाळीत सामाजिक बांधिलकीचा एक आगळावेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न ठरणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »