DSEK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्व तिसगाव रोड परिसरातील साई तिसाई पॅलेस इमारतीमधील एका बंद खोलीत गॅस गळती होत असल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.खोलीचा दरवाजा बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी खोलीतील गॅस शेगडीचे बटन सुरू असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ शेगडीचे बटन बंद केले.अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर अग्निशमन दलाने नागरिकांना
घरातून बाहेर पडताना गॅस शेगडीचे बटन व्यवस्थित बंद आहे की नाही, तसेच गॅस रेग्युलेटर बंद आहे की नाही, याची खात्री करावी. गॅसचा वास आल्यास कोणतेही विद्युत स्विच सुरू किंवा बंद न करता तातडीने खिडक्या-दारे उघडावीत आणि सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन करण्यात आले



