महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम

कल्याणच्या ‘नेतिवलीच्या राजा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी,नीट पेपरफुटीचा देखावा ठरतोय आकर्षण

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण : गणेशोत्सव म्हटलं की आकर्षक सजावट, रोषणाई आणि विविध देखावे पाहायला मिळतात. मात्र कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाने यंदा साकारलेला ‘नीट परीक्षा पेपरफुटी’चा देखावा समाजातील एका गंभीर आणि ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या विषयाची प्रभावी मांडणी करण्यात आल्याने हा देखावा गणेशभक्तांसाठी विशेष लक्षवेधी ठरत आहे.
मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच पदाधिकारी सुनील केणे, नितीन बनसोडे, विलास बाईत आणि आनंद शिंदे यांच्या सहकार्याने हा देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाचे यंदाचे हे ४० वे वर्ष असून, ‘नेतिवलीचा राजा’ या नावाने मंडळाचा गणपती प्रसिद्ध आहे.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि त्याचा विद्यार्थी व पालकांवर होणारा परिणाम या मुद्द्यांवर देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता किती महत्त्वाची आहे, हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.
जय गणेश मित्र मंडळाकडून यापूर्वीही मराठी भाषा अभिमान, ऑनलाइन लॉटरी यांसारख्या सामाजिक आणि जनजागृतीच्या विषयांवर देखावे साकारण्यात आले आहेत. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या देखाव्यांची यापूर्वीही दखल घेत मंडळाला विविध पुरस्कार आणि पारितोषिके मिळाली आहेत.
विशेष म्हणजे मंडळाच्या मंडपात धार्मिक पावित्र्य आणि शिस्तीला विशेष महत्त्व दिले जाते. मंडप परिसरात स्वच्छता, शांतता आणि सुमधुर संगीताचे वातावरण राखत गणेशाचे पूजन केले जाते. त्यामुळे ‘नेतिवलीच्या राजा’च्या दर्शनासोबतच सामाजिक संदेश देणारा यंदाचा देखावाही गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्याची परंपरा जय गणेश मित्र मंडळाने यंदाही कायम ठेवली असून, नीट पेपरफुटीचा देखावा विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत विचार करायला लावणारा ठरत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »