DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी प्रदेश कार्यकारिणी व जिल्हा युनिटच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रमुख आदरणीय भंते गौतमरत्न महाथेरो तसेच भिक्खू संघाची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
बुद्धभूमी फाउंडेशनच्या विरोधात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, एमएमआरडीए आणि स्थानिक पोलिस यंत्रणेकडून एकतर्फी व अन्यायकारक कारवाई करण्यात आल्याचा आरोप बसपाने केला आहे. तसेच या प्रकरणात टीडीआर घोटाळ्याशी संबंधित गंभीर बाबींची चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पाहणी दरम्यान ॲड. सुनील डोंगरे यांनी बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेसंदर्भातील सर्व कागदपत्रे, न्यायालयीन आदेश तसेच विविध आयोगांच्या आदेशांचा अभ्यास केला. या प्रकरणात कायदेशीर बाजू समजून घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या वतीने न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना डोंगरे म्हणाले की, राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समाजाच्या मालमत्तेचे संरक्षण होणे आवश्यक आहे. या घटकांवर अन्याय होत असल्यास बहुजन समाज पार्टी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. आवश्यक असल्यास तज्ज्ञ वकिलांची मदत घेऊन न्यायालयात लढा दिला जाईल.
दरम्यान, सोमवारी या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुद्धभूमी फाउंडेशनच्या शिष्टमंडळासोबत लेखी तक्रार सादर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तसेच, भिक्खू संघ आणि त्यांचे प्रमुख यांना संभाव्य धोका लक्षात घेता ठाणे पोलिसांनी तात्काळ पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली आहे.
बुद्धभूमी फाउंडेशन प्रकरणाला आता राजकीय आणि कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले असून, येत्या काही दिवसांत या विषयावर राज्यस्तरावर अधिक घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- June 8, 2026
कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशन आंदोलनाला बसपाचा पाठिंबा, केला न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्धार
Related Post
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



