महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

खोटी माहिती देत मानसिक त्रास; उपोषणकर्त्या महिलेवर नितीन गायकवाड यांचा आरोप वडिलोपार्जित जागेवरील घर नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – आमच्या राहत्या घराची जागा ही स्वतःच्या मालकी हक्काची वडिलोपार्जित जमीन असून त्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावावर असतानाही एका महिलेने जाणीवपूर्वक खोटी माहिती देत महापालिका अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप नितीन गायकवाड यांनी केला आहे. संबंधित महिला आमचे घर अनधिकृत असल्याचे दाखवून आमच्याकडून पैसे उकळण्याचा तसेच मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
नितीन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपोषणासाठी बसलेल्या महिलेचे वडील प्रभाकर मिरजकर यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी डिपॉझिट पद्धतीने दरमहा 45 रुपये भाडेकरारावर जी प्लस दोन इमारतीत खोली घेतली होती. मात्र संबंधित इमारत 1990 साली धोकादायक घोषित करण्यात आली होती. त्यानंतर मिरजकर यांच्यासह जवळपास 20 भाडेकरूंनी इमारत सोडून इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. महापालिकेच्या आदेशानुसार ती धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती.
यानंतर काही भाडेकरूंनी न्यायालयात स्पेशल सिव्हिल सूट दाखल केली होती. मात्र 17 डिसेंबर 1999 रोजी न्यायालयाने हा दावा डिसमिस केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर अनेक वर्षे कोणत्याही भाडेकरूंनी पुढील कायदेशीर प्रक्रिया केली नसल्याचा दावा त्यांनी केला.
गायकवाड कुटुंबाने वाढत्या कुटुंबाच्या गरजेनुसार 2015 साली स्वतःच्या नावावरील जागेत जी प्लस वन स्वरूपाचे स्वतंत्र घर बांधले. दीडशे चौरस मीटर क्षेत्रामध्ये बांधकामासाठी महापालिकेची स्वतंत्र परवानगी आवश्यक नसल्याचे समजल्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र तब्बल दहा वर्षांनंतर, 2025 मध्ये मयत प्रभाकर मिरजकर यांच्या मुलीने हे घर अनधिकृत असल्याची तक्रार महापालिकेकडे दाखल केली. या तक्रारीनंतर आम्हीही आश्चर्यचकित झालो होतो. मात्र त्यानंतर आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करत 24 डिसेंबर 2025 रोजी घर नियमानुकूल करण्यासाठी नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
जी. एन. गंधे आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू असून 17 मार्च 2026 रोजी घराचा डीपी रिमार्क पूर्ण झाला आहे. सध्या हा प्रस्ताव सहाय्यक नगररचना विभागाकडे नियमानुकूलतेसाठी प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली.
असे असतानाही संबंधित महिला केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि आम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. तसेच ती महापालिका मुख्यालयाबाहेर उपोषणाला बसून आमच्या कुटुंबाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती देत बदनामी करत असल्याचे त्यांनी म्हटले.
“उपोषण करणे हा लोकशाही मार्ग असून त्याला आमचा विरोध नाही. मात्र महापालिका अधिकारी आणि प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती देऊन आमची बदनामी करू नये. महापालिकेकडून खरी आणि संपूर्ण माहिती घेऊनच संबंधित महिलेने माध्यमांसमोर भूमिका मांडावी,” अशी अपेक्षा नितीन गायकवाड यांनी व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »