महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
क्रिडा न्युजडेस्क

ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात,खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

DESK MARATHI NEWS NETWORK.

डोंबिवली/प्रतिनिधी  – कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात मागील दहा वर्षाच्या कालावधीत विविध शहरांमध्ये अनेक क्रीडा सुविधा उभ्या राहिल्या असतानाच आता डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपथात आला आहे. या संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला आता लवकरच सुरुवात होत आहे. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलांची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने या क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर जात आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. यामध्ये विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या टप्पा १ मधे इंडोर क्रीडासंकुल आणि ऑलिंपिक दर्जाचा तरणतलाव उभारण्यात येणार आहे. तर टप्पा २ मध्ये स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांच्या सरावासाठी अत्याधुनिक सुविधांनी आणि साहित्यांनी सुसज्ज असे हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने खेळाडूंसाठी मतदारसंघातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्यात आहेत. खासदार क्रीडा संग्राम ही स्पर्धा अल्पावधीत देशभरात गाजली. तर क्रीडा सुविधांमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कळवा, दिवा, मुंब्रा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा आणि सुसज्ज साहित्य असलेली क्रीडा संकुलांचा समावेश आहे. याच अंतर्गत अंबरनाथ येथे शूटिंग रेंज, क्रीडा संकुल, ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव, उल्हासनगर शहरात क्रीडा संकुल, डोंबिवलीत क्रीडा संकुल, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर कळवा येथे ऑलिंपिक दर्जाच्या तलावाचे नूतनीकरण आणि क्रीडा संकुलात विविध सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

याच पद्धतीने आता डोंबिवली येथील ह. भ. प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपथात आला आहे. डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या क्रीडा संकुलात संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडू विविध मैदानी खेळांच्या सरावासाठी येत असतात. याच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने प्रयत्नशील होते. यासाठी शासनाकडे भरीव निधीची मागणी देखील त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या क्रीडा संकुलाच्या विकासासासाठी भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. तर इंडोअर आणि आऊटडोर स्टेडियम उभारले जाणार आहे. या कामाची लवकरच प्रत्यक्ष उभारणी करण्यात आली आहे.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा महत्वाचा प्रकल्प साकार होत आहे. संपूर्ण कामकाज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या निधीतून करण्यात येत असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाची देखभाल व व्यवस्थापन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाकडे सोपविण्यात येणार आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. त्याचसोबत एक हजार दोनशे पन्नास चौ.मी. क्षमतेचा आंतरराष्ट्रीय मानकांचा तरणतलाव, चारशे चौ.मी. डायव्हिंग पूल व प्लॅटफॉर्म, तसेच सोळा हजार चौ.मी. तळघर पार्किंगची सोय निर्माण केली जाणार आहे.

या संकुलात इंडोर क्रीडा संकुलात योगा, जिमनॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, जुडो, स्क्वॅश, स्नुकर, शूटिंग रेंज, जिमनॅस्टिक अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध असतील. त्याचबरोबर आदरातिथ्य व निवास व्यवस्था, भव्य बॅक्वेट हॉल्स, आधुनिक फिजिओथेरपी केंद्र आणि बहुपयोगी सभागृह देखील या प्रकल्पाचा भाग आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »