महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

कल्याण डोंबिवलीच्या ६ प्रभागक्षेत्रांत २ हजार ३०० टनांहून अधिक कचरा संकलन

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ७ प्रभागांसाठी अवघ्या ३ महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. महापालिका प्रशासनाकडून या सातपैकी ड, जे, फ, ग, ह आणि आय या ६ प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित एका प्रभागाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या सहाही प्रभाग क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत (इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग – itac) तब्बल २ हजार ३६३ टनांहून अधिक कचरा संकलन करण्यात आले आहे.

चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या१० पैकी ७ प्रभागांतील कचरा संकलन आणि वाहतूकीचे काम सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेला देण्यात आले आहे. महापालिकेच्या ई प्रभागक्षेत्र वगळता उर्वरित ६ प्रभाग क्षेत्रामध्ये हे स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. आजच्या तारखेपर्यंत ड, जे, फ, ग, ह आणि आय प्रभागांत पूर्ण क्षमतेने कचरा संकलन आणि वाहतूकीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित एका प्रभागाची हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ती पूर्ण होईल असा विश्वास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहा प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या Itac म्हणजेच initial total area cleaning मोहिमेत तब्बल २ हजार ३०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात आला. आता यापुढे या सहाही प्रभागांमध्ये नियमितपणे दिवसातून ३ वेळा कचरा उचलण्यात येणार आहे.

तर या प्रभागांतील काही ठिकाणी पूर्ण स्वच्छता करूनही सतत कचरा टाकण्यात येत असल्याने अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कॉम्पॅक्टर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून मोकळ्या जागेमध्ये पडणारा कचरा त्या कॉम्पॅक्टर कंटेनरमध्ये जाईल. या स्वच्छता उपक्रमाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून या प्रभागांचीही आता स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत प्रभागक्षेत्रनिहाय कचरा संकलन
ड प्रभाग ४३६ टन – १९ मे ते २ जून
जे प्रभाग ८१६ टन – २४ मे ते २५ जून
फ प्रभाग ६८ टन – २४ जून ते ६जुलै
ग प्रभाग ४१.१६ टन -६जुलै ते १३ जुलै
ह प्रभाग १४६ टन – ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट
आय प्रभाग – ८५६ टन-१२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »