महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य ताज्या घडामोडी

डोंबिवलीत अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल, सूतिकागृहाच्या नव्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या सूतिकागृहासह अत्याधुनिक अशा कॅन्सर रुग्णालयाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भूमीपूजन करण्यात आले. यासोबतच डोंबिवलीतील विविध विकासकामांचेही मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पणही संपन्न झाले.

गेले काही वर्ष वापराविना पडून असलेल्या या इमारतीच्या जागेवर कर्करोग रुग्णालय उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरु होता. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हेदेखील या रूग्णालयाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ठाणे जिल्ह्याला लवकरच एक सुस्सज असे कर्करोग रुग्णालय मिळणार आहे.नवीन बांधण्यात येणारे सुसज्ज असे कॅन्सर आणि प्रसुती रुग्णालय हे तळ +8 मजली असून त्यामध्ये 150 बेड्स असणार आहेत. यापैकी 100 बेड्स कर्करोगग्रस्त आणि 50 बेड्सचे प्रसुतीगृहासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

सुतिकागृहामध्ये प्रसूतीविषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. सुसज्ज कर्करोग रुग्णालयामुळे मुंबई, ठाण्याएवजी आता महानगरपालिका क्षेत्रातच उपचार मिळणे शक्य होणार आहे. या कर्करोग रुग्णालयामध्ये रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया आदी कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार आहेत. तसेच रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. तर इतर रुग्णांना CGHS (Central Government Health Scheme) दराने सेवा उपलब्ध होणार आहेत.

अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय आणि सूतिकागृहासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेतील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, अद्ययावत फिश मार्केटचे ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन करण्यात आले. तर सुनिल नगर येथील सुसज्ज अभ्यासिका, शास्त्रीनगर रुग्णालयातील 10 बेडचे एनआयसीयू आणि शवविच्छेदन केंद्र आदी विकासकामांचेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण केले.आपल्या मतदारसंघाला डॉक्टर खासदार लाभलेला असल्यानेच कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात 400 हून अधिक खासदार निवडून येतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रविंद्र फाटक, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »