नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – गणेशोत्सवाच्या धामधूमी नंतर लागलीच ईद चा उत्साह देखील दिसून आला. कल्याण मध्ये ईद ए मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने मोठी शोभायात्रा काढण्यात आली. इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जयंती निमित्त दरवर्षी भव्य मिरवणूक काढली जाते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे 28 तारखेला ईद मिलादचा सण होता. पण गणेश विसर्जना मुळे एक दिवस उशिराने हा सण सजरा करण्यात आला. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले होते. तर दुसरीकडे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.