नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी / प्रतिनिधी – महाराष्ट्र हे उत्सवप्रिय राज्य आहे. सर्वधर्मसमभाव तत्वाचे पालन करत संपूर्ण गाव एकमेकांच्या धार्मिक समारंभात सहभागी होतात. गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्या नंतर लगेच ईद चा उत्साह देखील साजरा केला गेला. रत्नागिरीत मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यानिमित्त शहरातील कोकण नगर ते मारुती मंदिर या भागात जुलूस काढण्यात आला. त्यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
हा उत्सव मोहम्मद साहिबांच्या जीवनाची आणि शिकवणीची आठवण करून देतो. मिलाद-उन-नबी हा इस्लामी महिन्यातील तिसरा महिना रबी-उल-अव्वलच्या 11 व्या आणि 12व्या दिवशी साजरा केला जातो. मोहम्मद साहिबांनी अल्लाहच्या आदेशाने जो धर्म सुरू केला त्याला इस्लाम म्हणतात. या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देतात. पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घर आणि मशिदी विद्युत रोषणाईनं सजवल्या आहेत. रात्रभर प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. घराघरात तसेच मशिदींमध्ये कुरान पठण केले जाते.



