ठाणे/प्रतिनिधी – भिंवडी तालुक्यातील पडघा येथे कोरोना काळात जिवावर उदार होवून सेवाबजावणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, डाॅक्टर,महिला पोलीस,परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आदी संवर्गातील तब्बल 851 महिलांचा गौरव केंद्रिय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रिय मंत्री पाटील सन्मान करताना म्हणाले की, जेव्हा देवाची दारे बंद होती त्या वेळेस लोकांना सकंटातुन वाचविण्याचे अहोरात्र काम डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी करत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना महिला व बालकल्याण समिती सभापती श्रेया गायकर म्हणाल्या की, मला सभापती पद मिळाल्याने , मला सर्व माता भगीनींची सेवा करुन सन्मान करण्याचे पुण्याचे काम करता आले, त्यामुळे मी स्व:ताला भाग्यवान समजते. या कार्यक्रमासाठी भिवंडी प.स.सभापती नमीता गुरव, जि.प.गटनेते उल्हास बांगर, जि.प.सदस्य, देवेश पाटील, वृषाली शेवाळे, त्याचबरोबर सन्मानीय पंचायत समिती सदस्य, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल कल्याण) संजय बागूल उपस्थित होते.
- December 1, 2021
भिवंडीतील कोरोना योध्यांचा केद्रिंय मंञी कपिल पाटील यांचे हस्ते सन्मान
Related Post
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



