महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधत काळजी घेण्याचे आवाहन

ठाणे/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण सर्वांनी कोवीड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कोरोनाशी लढायचेही आहे आणि जिंकायचेही आहे असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्यांदा कोवीड पॉझिटिव्ह झालेल्या खासदार शिंदे यांच्यावर गेल्या आठवड्यापासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्यांनी सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

सध्या कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा आरोग्य सुविधांवर मोठा ताण आला आहे. मात्र अशा परिस्थितीतही ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा लोकांच्या सेवेसाठी झटत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना बेड, ऑक्सिजन, इंजेक्शनची मोठी गरज भासत आहे. ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आपण सतत महापालिका आयुक्त आणि सीईओंच्या संपर्कात असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
तर कोवीडला पूर्णपणे आळा घालण्यासाठी लोकांनी शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत कोवीडशी आपल्याला लढायचेही आहे आणि त्याला हरवायचेही आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे 2 महिन्यात दुसऱ्यांदा कोवीड पॉझिटिव्ह आले असून गेल्या वेळेपेक्षा यावेळी त्यांना कोवीडची उग्र लक्षणे जाणवू लागल्याने आठवड्याभरापासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्यांनी सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधत काळजी घेण्याचे आवाहन केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »