महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

शासकीय वसुली थांबवण्यासाठी कोळी समाजाने वंचितच्या उमेदवाराला निवडून द्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

पंढरपूर प्रतिनिधी– कोळी समाजा च्या लोकांकडे व्हॅलेडीटी सर्टिफिकेट नसल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सर्टिफिकेट नसताना नोकरी मिळविली म्हणून सरकारची फसवणूक केली आहे असे गृहीत धरून शासनाने अश्या लोकांकडून कोट्यावधी रुपयांची वसुली करण्यास सुरुवात केली आहे. ही वसुली थांबवायची असेल तर विधानसभेच्या पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मोटे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

कोळी समाजाला सर्टिफिकेट मिळावे म्हणून वंचित बहुजन आघाडीने आंदोलन उभे केले होते. परंतु त्यांना व्हॅलेडीटी सर्टिफिकेट मिळाले नाही. म्हणून अनेकांना सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आले. शिवाय सर्टिफिकेट न देणाऱ्या लोकांवर शासनाची फसवणूक केली आहे म्हणून कारवाईला सुरुवात झाली आहे. नोकरी काळात शासनाने अशा लोकांवर कोट्यावधी रुपये खर्च केले असून त्याची वसुली करण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले की अशा प्रकारची वसुली महादेव कोळी समाजाला परवडणारी नसून त्यांनी हे का सहन करावे, ही वसुली थांबवायची असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की त्यांनी वसुली करू नये अशी भूमिका घेतली. उद्याची वसुली थांबवण्यासाठी महादेव कोळी समाजाला आपण आवाहन करतो की त्यांनी पंढरपूर मध्ये होणाऱ्या पोट निवडणुकीत वंचितचे उमेदवार बिरप्पा मोटे यांच्या कपबशी चिन्हां समोरील बटन दाबून त्यांना विजयी करावे, असे झाले तर भविष्यातील ही वसुली थांबविण्यात येणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »