महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम मनोरंजन

डोंबिवलीत शारदीय नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना दिमाखात सुरुवात,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुख्य उपस्थिती

DESK MARATHI NEWS NETWORK.

डोंबिवली/प्रतिनिधी -आपल्या सुरेल, भावपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या बहारदार संगीत मैफलीने डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आज दिमाखात शुभारंभ झाला. डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर आयोजित या संगीत सोहळ्याला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राहुल देशपांडे यांच्या सुरेल सादरीकरणाने संपूर्ण वातावरण संगीतमय झाले, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या संगीतप्रेमी आणि रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या गायकीला उत्स्फूर्त दाद दिली.
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात यंदा भक्ती आणि संगीताच्या अनोख्या संगमाने झाली.

सकाळी बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग आणि विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर सायंकाळी राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीने उत्सवाच्या सांस्कृतिक पर्वाला सुरुवात झाली. शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, नाट्यसंगीतातील भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि सुरांची विलक्षण जाण यांचा प्रत्यय देणाऱ्या त्यांच्या गायनाने उपस्थित रसिकांना स्वरानंदाची अविस्मरणीय अनुभूती दिली.

राहुल देशपांडे हे शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताच्या क्षेत्रातील लोकप्रिय नाव असून, त्यांच्या गायकीतून सादर होणारी प्रत्येक रचना रसिकांना स्वरांच्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आजच्या मैफलीतही त्यांच्या सादरीकरणातील सुरेलता, भावपूर्णता आणि गायनातील सहजता यांचा सुंदर आविष्कार अनुभवायला मिळाला. त्यांच्या गायकीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला भरभरून दाद दिली. संगीताच्या सुरांनी भारलेल्या या वातावरणात डोंबिवलीकरांनी या मैफलीचा मनमुराद आनंद लुटला.

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतीला नवसंजीवनी लाभावी आणि महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, या मंगल संकल्पनेतून सहस्रचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर नागरिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी मिळावी, या उद्देशाने राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती, संस्कृती आणि संगीत यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उत्सवाची लोकप्रियता अधोरेखित करणारा ठरला.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित हा शारदीय नवरात्रोत्सव ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे. राहुल देशपांडे यांच्या सुरेल मैफलीने पहिल्याच दिवशी उत्सवात चैतन्य निर्माण केले असून, आगामी कार्यक्रमांसाठीही डोंबिवलीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »