DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी-केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. कल्याण पश्चिमेतील बाजार परिसरात काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंह यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर तसेच केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर काँग्रेसकडून यावेळी जोरदार आक्षेप नोंदवण्यात आला.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंह यांनी यावेळी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.



