महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीत मिठाचा खडा,भाजप जिल्हाध्यक्षांची मनसेला सत्तेबाहेर काढण्याची मागणी

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीच्या राजकारणात मनसे वरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. भाजपाचे कल्याण जिल्हा नंदकिशोर परब यांनी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र पाठवून महायुतीतील शिवसेनेच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. मनसेला सत्तेतून तत्काळ बाहेर न काढल्यास भाजप स्वतंत्र निर्णय घेईल, असा थेट इशाराच या पत्राद्वारे देण्यात आलाय.

​पत्रातील महत्त्वाचे मुद्दे आणि भाजपचे आक्षेप:

​१. विश्वासात न घेता मनसेचा समावेश:

२०२६ च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ‘महायुती’ म्हणून लढले होते, तर मनसेने महायुतीविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला विश्वासात न घेता परस्पर मनसेला सत्तेत सोबत सामील करून घेतले, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. भाजपने केवळ महायुतीचा धर्म पाळण्यासाठी याला विरोध केला नव्हता.

​२. मनसेकडून भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका:

सत्तेत सामील होऊनही मनसेचे पदाधिकारी भाजपच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आणि महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. त्यातच ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील एका कॉलेजमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा काढून अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण केले, असा घणाघाती आरोप करत भाजपने याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

​३. भाजपचा अंतिम इशारा:

भाजपने पत्राद्वारे शिवसेनेला स्पष्ट बजावले आहे की:
​मनसेच्या या कृत्याबद्दल शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी.

​कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून मनसेला तातडीने सत्तेबाहेर काढावे.
​अन्यथा, भाजप आपला स्वतंत्र निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे, याची नोंद घ्यावी.

​पत्राच्या शेवटी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी “आपण महायुती मजबूत राहण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय कराल” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान या पत्रामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप यांच्यात मनसे वरून वाद होण्याची शक्यता आहे
तर आता शिवसेना यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »