महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संकल्पपत्र जाहीर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले. पुढील पाच वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण अशी विविध महत्त्वाची कामे करण्यावर आपण भर देणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्याला २०१४ मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्याने, २०१९ मध्ये साडेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले. गेल्या १० वर्षांत आपण कल्याण लोकसभेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच गेल्या निवडणुकीत आपण दिलेल्या आश्वसनांपैकी ९० टक्के कामे पूर्ण केली असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर या निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम करताना दिसत आहेत. श्रीकांत शिंदे हे आपल्याच पक्षाचे उमेदवार आहेत, अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना झाल्याचे दिसत असून पावलो-पावली त्याची प्रचिती येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »