महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याणातील महाकाय होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आ. विश्वनाथ भोईर यांची मागणी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/KyAvyD_nj9Q?si=saP_cS2DgyJqJVZw

कल्याण/प्रतिनिधी – घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर सगळीकडील महाकाय होर्डिंगचा आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील सर्व होर्डिंगचे महापालिका आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करत कल्याणात अशी दुर्घटना घडल्यास आम्ही संबंधित अधिकाऱ्याला अजिबात माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.

घाटकोपर येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित दुर्घटना आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ज्या ज्या ठिकाणी भलीमोठी होर्डिंग उभारले आहेत, त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी. त्यांची तपासणी करावी, तसेच ही महाकाय होर्डिंग अधिकृत आहेत की अनधिकृत याचाही तपास करून महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग उभारणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिले आहेत.

तर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड या आयएएस अधिकारी असून त्यांचा इतर अधिकाऱ्यांवर वचक असणे आवश्यक आहे. कल्याणात उभारण्यात आलेल्या या भल्या मोठ्या होर्डिंगना कोणत्या आधारे आणि कोणत्या नियमानुसार परवानगी दिली याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच महापालिका आयुक्तांनी इथल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते अधिकृत आहेत की अनधिकृत ते तपासावे, त्यात कोणताही गलथानपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच कल्याणात अशा प्रकारची घटना घडू नये याची काळजी घ्यावी आणि लोकांनीही त्यांना कुठे असा प्रकार आढळून आल्यास आपल्याला किंवा महापालिका प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »