महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी तोंडाला काळे फासून नागरिकांचा केडीएमसीवर मोर्चा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवली दत्तनगर आयरे परिसरात क्लस्टर योजना राबविली जाणार आहे. या योजनेकरीता बायोमेट्रीक सर्वेक्षण केले जात आहे. काही भूमाफियांमुळे हे सर्वेक्षण बंद पाडले जात आहे. त्यामुळे गरिबांना क्लस्टर योजनेतून हक्काचे घर मिळणार की नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करीत नागरिकांनी स्वत:च्या तोंडाला काळे फासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर निषेध मोर्चा काढला. महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरिकांसह तोंडाला काळे फासत सहभागी झाले होते. धोकादायक इमारतीतील नागरिक जीव मुठीत धरून राहत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. महापालिकेने ४१ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यापैकी सगळ्यात प्रथम कल्याणमधील कोळसेवाडी आणि डोंबिवलीतील दत्तनगर आयरे परिसरात ही योजना प्रथम राबविली जाणार आहे. त्याकरीता बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यासाठी १० कोटी रुपये खर्चाची निविदा मंजूर करुन हे काम एका एजेन्सीला दिले आहे. या एजेन्सीकडून काम सुरु करण्यात आले. डोंबिवलीतील दत्तनगर आयरे परिसरात बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम भूमाफियांकडून बंद पाडले जाते. सर्वेक्षण सुरु करण्याची मागणी अनेकवेळा करुन देखील बंद पडलेले सर्वेक्षण सुरु झालेले नाही. सर्वेक्षण पोलिस संरक्षणात केले जाईल असे लेखी पत्र महापालिकेने दिले होते. मात्र, महापालिका केवळ पत्र व्यवहार करुन नागरिकांची बोळवण करीत आहे. शासन तुमच्या दारी डोंबिवलीत कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्याच्या हस्ते हा प्रश्न सोडवू असे म्हंटले होते. यावरुन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे नागरिकांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप नायक यांनी केला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »