नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – दसरा हा सण सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर घरात कायम बरकत राहते. अशी नागरिकांची भावना असल्यामुळे आजचा दसरा सणाचा मुहूर्त साधण्याकरता जळगावच्या सुवर्णनगरीत सकाळपासूनच सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं.
57 हजार रुपयांपर्यंत सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसानंतर सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचे भाव हे 61 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना ग्राहकांचे बजेट कोलमडला आहे. मात्र आज दसरा सण आहे दसरा सणाला सोने खरेदीचा विशेष महत्त्व असल्यामुळे आज थोडं फार कमी खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासूनच सराफ बाजारातील दुकानांमध्ये गर्दी केल्याचं चित्र दिसून आले.
दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सोनव्यवसायिकांकडूनही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात ग्राहकांचे विशेष आकर्षण असलेला खऱ्या सोन्याचं आपट्याचे पान हे सुद्धा प्रत्येक वजनामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. भावावाढ झाली असली तरी मात्र सकाळपासूनच आज दसरा असल्यामुळे ग्राहकांचा ओघ पाहायला मिळत असून दिवसभर ग्राहकांच्या गर्दीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.