महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

प्रवेश शुल्क आणि बँक हमीसाठी तर्कसंगत- योग्य दर आकारण्‍यासाठी ‘ट्राय’कडून शिफारसी जारी

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – ‘ट्राय’ म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज “प्रवेश शुल्क आणि बँक हमी यांची दर आकारणी तर्कसंगत- योग्य असावी, या संदर्भात शिफारशी जारी केल्या आहेत. दूरसंचार विभागाने  (डीओटी ), पत्र क्र. 20-577/2016-AS-I Vol.III नुसार  3 मार्च 2022 रोजी ट्रायला एक पत्र पाठवले होते. यानुसार  दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध परवान्यांसाठी प्रवेश शुल्क आणि बँक हमी  यांचे दर तर्कसंगत करण्यासाठी कळवले होते.

यानुसार ट्रायने दरविषयक विविध शिफारसी सूचवल्‍या आहेत. यामध्ये संभाव्य प्रवेशकर्त्यांनी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी एक निश्चित रक्कम, प्रवेश शुल्क म्हणून  भरावी. हे  प्रवेश शुल्क सामान्यत: परत केले जाणार नाही. अशा प्रकारचा खर्च हा त्या कंपनीसाठी  ‘स्टार्ट-अप खर्च’ असतो. तसेच  बँक हमी म्हणजे  सरकारच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आर्थिक साधन आहे. परवानाधारकाने त्याची देय रक्कम वेळेवर भरली आहे आणि परवाना करारामध्ये नमूद केलेल्या अटी आणि नियमांनुसार त्यांची जबाबदारी पूर्ण केली आहे, हे त्यातून स्पष्‍ट होते.

ट्रायच्या वतीने  दि. 26 जुलै 2022 रोजी “प्रवेश शुल्क आणि बँक हमींचे तर्कसंगतीकरण” या विषयावर  झालेल्या विचारविनिमयाच्या आधारावर एक संदर्भ  दस्तऐवज  जारी केला आहे. त्यावर  23 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर 2022 पर्यंत हितधारकांकडून लिखित टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या मागविण्यात आल्या होत्या.  उद्योग संघटनांच्या/ भागधारकांच्या विनंतीवरून, लेखी टिप्पण्या आणि प्रति-टिप्पणी सादर करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 6 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. प्राधिकरणाला विविध भागधारकांकडून 20 टिप्पण्या आणि 1 प्रति-टिप्पणी प्राप्त झाली. या सर्व टिप्पण्या आणि प्रति-टिप्पणी ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आभासी माध्‍यमाद्वारे 9 डिसेंबर 2022 रोजी या दस्तऐवजामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ‘ओपन हाऊस’  चर्चा  आयोजित करण्यात आली होती.
परवान्याच्या नूतनीकरणाच्या वेळी प्रवेश शुल्क न घेण्याची शिफारसही प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे  विद्यमान तसेच नवीन प्रवेशकर्त्यांवरील आर्थिक भार कमी होण्‍यास मदत होईल.  आणि विशेषतः यूएल (व्हीएनओ) परवानाधारकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

“प्रवेश शुल्क आणि बँक हमींचे तर्कसंगत आकारणी ” याविषयी आलेल्या सर्व शिफारशींचा संपूर्ण मजकूर ‘ट्राय’ च्या www.trai.gov.in या  संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. यासंदर्भात  स्पष्टीकरण हवे असेल /माहिती हवी असे तर,  अमित शर्मा, सल्लागार (F&EA) यांच्याशी advfea2@trai.gov.in किंवा दूरध्वनी क्रमांक +91-11-23234367 वर संपर्क साधता येईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »