महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी देश

भारतीय तटरक्षक दलाकडून ‘ऑपरेशन सजग’ चा सराव

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – ‘ऑपरेशन सजग’, ही किनारपट्टी सुरक्षा रचनेतील सर्व भागधारकांचा समावेश असलेली कवायत, भारतीय तटरक्षक दलाने पश्चिम किनारपट्टीवर राबवली. या कवायतीमुळे किनारपट्टी सुरक्षा यंत्रणेचे पुनर्प्रमाणीकरण करणे आणि समुद्रातील मच्छिमारांमध्ये जागरूकता निर्माण करणे सुलभ बनले. 

कवायती दरम्यान, समुद्रातील सर्व मासेमारी नौका, मालवाहू पडाव  आणि सागरी नावांच्या  कागदपत्रांची आणि क्रू पासची व्यापक तपासणी आणि पडताळणी करण्यात आली. या कवायतीमध्ये सीमाशुल्क, सागरी पोलीस, बंदरे आणि भारतीय नौदलाच्या एकूण 118 जहाजांनी भाग घेतला.

किनारी सुरक्षा रचना  मजबूत करण्यासाठी मच्छिमारांसाठी बायोमेट्रिक कार्ड जारी करणे, प्रत्येक राज्यानुसार मासेमारी नौकांचे ठराविक कलर कोडिंग, मासे लँडिंग केंद्रांचे व्यवस्थापन तसेच प्रवेश/ निर्गमन चेक पॉईंट्सवर प्रवेश नियंत्रण, कोस्टल मॅपिंग, सुरक्षा संस्थांसाठी  विशिष्ट सागरी बँड फ्रिक्वेंसी नियुक्त करणे, भारतीय तटरक्षक दलाकडून सागरी पोलिस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे यासारख्या अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. 

सुरक्षा यंत्रणांना बायोमेट्रिक कार्ड रीडरही देण्यात आले आहेत. तटीय सुरक्षा रचना  अंतर्गत शिडाच्या होड्यांच्या देखरेखीशिवाय, बेट सुरक्षा आणि समुदाय संवाद कार्यक्रम देखील राबविण्यात आले.

दिवसभर चालणाऱ्या या  कवायतीचे प्रत्येक महिन्यात आयोजन केले जाते आणि यातून मिळालेली माहिती किनारपट्टीच्या सुरक्षा रचनेत  सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शक मानली जाते. या कवायतीमुळे किनारपट्टीच्या सुरक्षेतील महत्त्वाचे धडे मिळण्यासोबतच कल अधोरेखित करणे आणि विविध किनारी सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीची पडताळणी करता येते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »