नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – अपुऱ्या पावसाभावी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांच्या ह्या अवस्थेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भोपळा आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट 25% अग्रीम पीक विमा दिला जावा अशी मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरील झाडाला भोपळा बांधून आंदोलनाने लक्ष वेधून घेतले आहे. तर राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाला भोपळा भेट देण्यात आला.
Related Posts



