महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारतातील सर्वात मोठे एकात्मिक ऊर्जा उपयोगिता महामंडळ आणि देशातील दुसरी सर्वात मोठी राष्ट्रीय तेल आणि वायू कंपनी यांनी अक्षय उर्जेच्या क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.  एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित (NTPC) आणि ऑइल इंडिया (Oil India) मर्यादित या ऊर्जा क्षेत्रात कार्य करणाऱ्या कंपन्यांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि डेरिव्हेटिव्ह्ज तसेच भू-औष्णिक ऊर्जेचा उपयोग वाढवण्याबरोबर डीकार्बोनायझेशन म्हणजेच कार्बनडाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी करणे किंवा शून्य करण्याच्या   क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य करारामुळे कार्बन ‘सिक्वेस्ट्रेशन’  सारख्या आधुनिक ‘डिकार्बोनायझेशन’  तंत्रज्ञानावर आधारित ज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण करणे सुलभ होणार आहे.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून या दोन दिग्गज महारत्न कंपन्यांचा अक्षय उर्जेच्या क्षेत्रात आपला सहभाग वाढवण्याचा आणि वर्ष 2070 पर्यंत देशाचे ‘नेट झिरो’  उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी शाश्वत उपाय शोधण्याचा मानस आहे.
एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग ऑइल इंडिया कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. रणजित रथ आणि या कंपन्यांचे इतर कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर नवी दिल्लीत स्वाक्षरी करण्यात आली.
एनटीपीसी सन 2032 पर्यंत 60  गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. हरित हायड्रोजन तंत्रज्ञान आणि ऊर्जा साठवण क्षेत्रात एक प्रमुख कंपनी बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. हायड्रोजन ब्लेंडिंग, कार्बन कॅप्चर आणि फ्युएल सेल, बसेस यासारख्या डिकार्बोनायझेशनच्या दिशेने कंपनीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »