नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/ प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेसंदर्भात सध्या संभाजीनगर शहरामध्ये वातावरण चिघळले असून जागोजागी निदर्शने आंदोलनं होत आहेत. मराठा समाजाच्या वतीने घोषणा देत जोरदार आंदोलन करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांचा तिरडीवर फोटो ठेवून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्यायात्रा काढत असताना आंदोलकांनी भर रस्त्यावर ठिय्या देत फडणवीसांचे फोटो फाडत तिरडीला अग्नी देण्यात आली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रस्ता रोखून धरला होता.
Related Posts



