नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – ऑगस्ट रोजी दुपारी जेतवन बुद्ध विहार, रेल्वे पोर्टर चाळ, कल्याण पूर्व येथील तथागत गौतम बुद्ध यांची मुर्तीची चोरी झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी कल्याण पूर्व अध्यक्ष बाबुशेठ तलाठी, विनोद रोकडे, महिला आघाडी अध्यक्षा ललिताताई आखाडे, अशोक कांबळे, सुमित ठोकळे यांनी घटनास्थळी जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेतली.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार कोळशेवाडी पोलिस स्टेशनचे अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडी कल्याण पूर्व शहर व महिला आघाडीच्यावतीने लेखी निवेदन देण्यात आले. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसारनुसार जेतवन बुद्ध विहारात जाऊन त्या ठिकाणी बुद्ध वंदना घेण्यात आली. व विभागात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर प्रसंगी ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गायकवाड, सुनील पगारे, महेंद्र जाधव, बाबुशेठ तलाठी, ललिताताई आखाडे, अशोक कांबळे, विनोद श्यामसुंदर रोकडे, सुमित ठोकळे, ईशा जाधव, शिलाताई शिंदे, पल्लवी दोंदे, सिध्दुताई मेश्राम, लताताई जगताप, सखुबाई खेडेकर, शारदा ताई कांबळे, जीतू अहिरे बाळु मोरे हे उपस्थित होते.