महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
अर्थसत्ता ताज्या घडामोडी

नवी मुंबईत बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी सहा कंपनी प्रमुखांना अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई / प्रतिनिधी – सीजीएसटी, नवी मुंबई यांनी आज, बोगस/बनावट संस्थांकडून मिळवलेल्या 5.01 कोटी रुपयांच्या पावत्यांच्या आधारावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याच्या/वापरल्याच्या/जारी केल्याच्या आरोपावरून सहा कंपन्यांचे मालक आणि त्यांचे व्यावसायिक व्यवहार हाताळणाऱ्या प्रमुख व्यक्तींना अटक केली. कोणत्याही वस्तू अथवा सेवांचा पुरवठा न करता बनवण्यात आलेल्या या बनावट पावत्यांची किंमत अंदाजे रु. 30 कोटी इतकी आहे. या सहा कंपन्याची नावे पुढील प्रमाणे:

मेसर्स ब्लूस्की ट्रेडिंग कंपनी (GSTIN – 27AAHHN6764P1ZA), मेसर्स स्कॉर्पियन एंटरप्रायझेस, (GSTIN – 27AKUPD0205A2ZR), मेसर्स सीए ट्रेडर्स (GSTIN – 27AOKPD3230P1ZS), मेसर्स अमृत ट्रेडर्स (Imp6LX164P1ZA), मेसर्स सोना ट्रेडिंग कंपनी (GSTIN – AOKPD2878R1Z4) आणि मेसर्स श्री सत्यम ट्रेडिंग कंपनी (GSTIN – 27AELPD5876Q1ZM).

सीजीएसटीचे फसवणूक विरोधी पथक आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या कंपन्यांची चौकशी केली. या कंपन्यांनी रु. 5.01 रकमेच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला असून, तो बोगस/बनावट संस्थांकडून बोगस पावत्यांच्या आधारे प्राप्त करण्यात आला आणि जारी करण्यात आला.

CGST कायदा, 2017 च्या कलम 132(1) (b) आणि (c) च्या तरतुदींनुसार, जर करदात्याने वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता पावत्या आणि/किंवा बिले जारी केली किंवा चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर किंवा वापर केला, किंवा अशा पावत्या किंवा बिल वापरून इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला, तर कलम 132(1) (i) नुसार करदात्याला दंडासह पाच वर्षांपर्यंतचा कारावास देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे कलम 132(5) नुसार, हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. उपरोक्त आरोपींना केंद्रीय वस्तू व सेवा अधिनियम, 2017 च्या कलम 69 (1) अंतर्गत सदर कायद्याच्या कलम 132 (1)(b) आणि (c) अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली, आणि आज (25.08.2023) बेलापूर येथील वाशी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केल्यावर, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सीजीएसटी नवी मुंबई विभागाच्या फसवणूक विरोधी अभियानाचा भाग होता. फसवणूक आणि करचुकवेगिरी करून, कायद्याचे पालन करणाऱ्या करदात्यांविरोधात चुकीच्या मार्गाने स्पर्धा निर्माण करून, सरकारी तिजोरीची लूट केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे, प्रभात कुमार- आयुक्त, CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, नवी मुंबई आयुक्तालय, यांनी ही माहिती दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »