नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने शिफारस केलेल्या 850 खेळाडूंमधून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज आगामी आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडापटूंना मान्यता दिली. ज्या खेळाडूंनी निवड निकष पूर्ण केले आहेत अशा 38 क्रीडा प्रकारातील 634 खेळाडूंना भाग घेण्यास मंजुरी दिली आहे.
2018 मध्ये झालेल्या शेवटच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 572 भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता.ज्यामध्ये भारताने 16 सुवर्ण पदकांसह 70 पदकं मिळवली होती.
आशियाई खेळांसाठी भारतीय संघाचा भाग असणार्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे.