महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

महाराष्ट्र दिनी कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महावितरणच्या कल्याण परिमंडल कार्यालयात बुधवारी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.

सन २०२३-२४ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुख्य अभियंता औंढेकर यांनी तांत्रिक कर्मचारी हे महावितरणच्या प्रगतीचे शिल्पकार असल्याचे नमूद करत अधिक जोमाने काम करून नवनवीन यशोशिखरे पादाक्रांत करण्याबाबत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, अधीक्षक अभियंता दीपक पाटील, निलकमल चौधरी, महेश अचिंनमाने, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता कौमुदी परदेशी, नरेंद्र धवड, वरिष्ठ व्यवस्थापक निलेश भवर, शशिकांत पोफळीकर, पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता स्मीता काळे यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अहिर यांनी आभार मानले.

पुरस्कार प्राप्त कर्मचारी
कल्याण मंडल एक – जनार्दन पानसरे, सुहास ढमणे, विश्वनाथ माळी, सुभाष चौधरी, सतिश म्हात्रे, सुशिल श्रीखंडे, असद पठाण, अतुल मेडपल्लीवार, लक्ष्मण हिंदोळा, भास्कर पारधी, ज्युड फर्नांडीस, संजय गवाळे, भारती तळोजेकर, बाजीराव पवार.
कल्याण मंडल दोन – विष्णु धिर्डे, उमेश भारती, विशाल पाटील, विशाल पावशे, नामदेव पवार, प्रितम गुंजाटे, विठ्ठल माठे, एकनाथ लखाडे, जगन्नाथ तुपे, कमलेश महाजन, संदिप बऱ्हाटे, शिवाजी लिहे, बळीराम हायलिंगे, नागनाथ लोकरे, रामदास मोटे, दिनेश राऊत.
वसई मंडल – शशिकांत सागर, अर्जुन गोवारी, रोहित भट, मधुकर घरत, मनोज शेंडे, सचिन जाधव, यतिन कोरे, विशाल राऊत, रोहन महाले, दिनकर खांडवी, अजित गिंभल, प्रकाश मुकने, राजकुमार शेंडे.
पालघर मंडल – हेमंत धर्ममेहेर, मुदस्सर खलिफा, अल्पेश वर्तक, दिनेश संखे, ज्ञानेश्वर गवळे, विठ्ठल निखाडे, चंद्रकांत वायेडा, सुनिल पाटील, रघुनाथ गायकवाड, अर्जुन सावंत.

Related Posts
Translate »