कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करावे ,महागाई भत्ता द्यावेत, अशा काही विविध मागण्यांसाठी आज एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यानी राज्यभरात संप पुकारला .या पार्श्वभूमीवर आज कल्याण मधील एसटी डेपो मध्ये देखील कर्मचार्यांनी संप पुकारत काम बंद आंदोलन केलं यामुळे कल्याण एसटी डेपो मधून सुटणाऱ्या एसटी गाड्या बंद झाल्या.मात्र राज्यातील इतर ठिकाणांहून येणाऱ्या बस मात्र सुरू ठेवण्यात आल्या होत्या. काही अनुचीत प्रकार घडू नए यासाठी एसटी डेपो मध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले एसटी डेपो मध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. कल्याण बस स्थानकातून इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी जाणारे नागरिक मात्र सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी खोळंबले होते.
- October 28, 2021
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
Related Post
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



