महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

भिवंडीत खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात, तीन जण जखमी

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी येथील रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर सध्या मोठं मोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात घडत आहेत. रविवारी पती व दिड वर्षाच्या मुली सोबत रक्षाबंधानासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेच्या पतीची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने अपघात झाल्याची घटना पायगाव येथे दुपारी घडली आहे. या अपघातात माहिलेसह पती व दिड वर्षांची मुलगी असे तीन जण जखमी झाले असून या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते.           

सुशीला संदेश गोऱ्हे ( वय २१ ) संदेश गोऱ्हे (२६ ) व त्यांची दिड वर्षांची एक मुलगी वैभवी असे खड्ड्यांमुळे जखमी झालेल्यांची नावे असून ते कामण येथील रहिवासी आहेत. आज रक्षाबंधनाचा सण असल्याने जखमी सुशीला गोऱ्हे या आपल्या माहेरी पायगाव ब्राम्हणपाडा येथे पती व मुलीसह दुचाकीवरून येत होत्या त्यावेळी पायगाव जवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने तिघेही गाडीवरून खाली पडले . झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून तिघांनाही स्थानिकांच्या मदतीने अंजुरफाटा येथील खासगी रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सुमारे एक तास जखमी महिला व तिचे पती रस्त्यावरच होते. रुग्णालयात नेण्यासाठी सुप्रीम इन्फ्रा टोल कंपनीची रुग्णवाहिका देखील याठिकाणी अली नव्हती. स्थानिक रिक्षा वाल्याच्या मदतीने हितेश तांगडी यांनी महिला व तिच्या जखमी पतीला खारबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र जखम जास्तअसल्याने पुढील उपचारासाठी अंजुरफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.              

विशेष म्हणजे मानकोली अंजुरफाटा चिंचोटी या रस्त्याकडे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीचे पुरता दुर्लक्ष असल्याने या रस्त्याची सध्या दुरावस्था होऊन अशा प्रकारचे अपघात रोज घडत आहेत. मागच्या आठवड्यात स्थानिकांनी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन केले होते तर दिन दिवसांपूर्वी रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा टोल नाका देखील फोडला होता. रस्त्यावर खड्डे असूनही टोल कंपनी टोल वसुली मात्र नियमित करीत असल्याने स्थानिकांमध्ये रस्त्याच्या दुरावस्थे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रीम कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.             

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »