महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

कल्याण मध्ये आदिवासी वाडीत झाडांना राख्या बांधत पर्यावरण रक्षणचा संदेश देत रक्षाबंधन साजरे

कल्याण/प्रतिनिधी – एकीकडे आज घराघरात बहीण – भावाकडून रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना कल्याणच्या आदिवासी वस्तीत मात्र अनोख्या पध्दतीने हा सण साजरा झालेला पाहायला मिळाला. “अनुबंध” संस्थेच्या माध्यमातून कल्याणच्या सापर्डे येथील पाणबुडे नगर आदिवासी वाडीतील महिला, मुलं आणि मुलींनी झाडांनाराख्या बांधत पर्यावरण रक्षणचा संदेश दिला.

कल्याणच्या या पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मुलांनी नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारची झाडं लावून त्यांचे पालकत्व स्विकारले आहे. आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे ही आदिवासी मुलं या झाडांचा सांभाळ करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजचा रक्षाबंधनाचा हा सण या आदिवासी बांधवांनी या झाडांसोबत साजरा केला. ज्याप्रमाणे बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळते आणि मग राखी बांधते अगदी त्याचप्रमाणे या आदिवासी महिला आणि मुलांनी झाडांना ओवाळून राख्या बांधल्याचे दिसून आले. बहीण -भावाच्या या नात्याबरोबरच आज पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील काळाची गरज बनली आहे. पर्यावरणासोबत सामाजिक रक्षणाची जबाबदारीही आपलीच असून आजच्या निमित्ताने त्याचा स्विकार केल्याचे या आदिवासी बांधवांनी सांगितले.
तर आजचा सण हा राखी बांधण्यापुरता सिमित न राहता मुलींचे शिक्षण, त्यांची सुरक्षितता, लहान वयातील विवाह, मारझोड या सर्वांपासूनही त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे अनुबंध संस्थेच्या विशाल जाधव यांनी सांगितले.

हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, बाळा शिंदे, वैभव देशमुख, नचिकेत कुलकर्णी (माणगाव), प्रभाकर घुले, राहुल साबळे यांच्यासह वस्तीतील इतर सर्व जण उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »