डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली येथील पहिला फिरता दवाखाना पूरग्रस्तांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी खेड आणि चिपळून येथे काल संध्याकाळी रवाना झाला. डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नाहर हाँस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने आ.राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभाग अध्यक्ष आणि नाहर मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटलचे संस्थापक दिनेश हिरामण पाटील यांच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी टिटी इंजेक्शन ,फ्लू होउ नये यासाठी गोळ्या, डायरिया विरोधी लस आणि ओषधे या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून २ दिवस सेवा देण्यात येणार असल्याचे मनसेचे शहर सचिव अरुण जा़भळे यांनी सांगितले. पूरग्रस्तांना भरघोस मदत करण्याचे आवाहन जनतेला मनसेच्या वतीने करण्यात आले.नाहर हाँस्पीटलच्या वतीने
पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नाहरचे संस्थापक कुणाल गायकर यांनी सांगितले.
- August 1, 2021
डोंबिवली मधून मनसे व नाहर हाँस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने फिरता दवाखाना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



