डोंबिवली/प्रतिनिधी- डोंबिवली मधील गांधीनगर मध्ये राहणाऱ्या फिर्यादीला तोतया पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करवून एका महिलेने तुमच्या वर गुन्हा दाखल असल्याचा माहिती देत ५ लाख रुपये खंडणी घेतली त्यावर वारंवार व्हाट्सएपच्या माध्यमातून १० लाख रुपये मागणी करून तीन लाख रुपये घेताना तोतया अधिकारी याला सापळा रचून कल्याणच्या दुर्गडी किल्ल्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात अटक केली आहे याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमा अन्वेय गुन्हा दाखल केला आहे .
फिर्यादी शंकर परब यांनी आपल्या कडे क्राईम ब्रँच वाशी येथील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तुषार श्रीमंत शिलवंत (३६) याने ५ लाखाची खंडणी मागितली फिर्यादी यांनी ती रक्कम दिली त्यावर वारंवार १० लाखाची मागणी करत जान्हवी नावाची महिलेने तक्रार दाखल केली आहे त्यापासून वाचण्यासाठी पैश्यांसाठी नेहमी तगादा करीत असल्याने फिर्यादी शंकर परब यांनी मानपाडा पोलीसांना घडलेली प्रसंग आणि घटना सांगितली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी आदेशानंतर पोलिस अधिकारी अनंत लांब ,पोलिस हवालदार दामू पाटील , विजय कोळी मधुकर घोडसरे संदीप बर्वे , महेंद्र मंझा प्रवीण किनरे ,संतोष वायकर , महादेव पवार या पथकाने सापळा रचू न कल्याण पश्चिमेतील शिवाजी महाराज चौकात तीन लाख रुपये घेताना आरोपीला अटक केली आरोपी हा मसाज करीत असलेल्या महिलेचा पती आहे आणि शंकर परब यांची मैत्री असल्याने हा घटना घडून आणली की ? त्या महिलांचा ही सहभाग आहे यांच्या अनेक पैलूंचा कंगोरा पोलीस तपासात आहेत .दरम्यान आरोपीवर भा द वी कलम ३८४,१७०, ५०६, ३४ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे यात दुसऱ्या आरोपींचा सहभाग असल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.
- May 14, 2021
पोलीस अधिकारी बनून ५ लाखाची खंडणी मागणारा तोतया गजाआड,डोंबिवली मानपाडा पोलिसांची धडक कारवाई
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



