महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी मुंबई

250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एमडीएलने केले विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड(Mdl) अर्थात माझगाव गोदीला 250 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अडीच शतकांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या असामान्य प्रवासाची आठवण कायम राखण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 1774 मध्ये एका लहानशा सुक्या गोदीच्या उभारणीने अतिशय साधेपणाने झालेल्या प्रारंभापासून ते 1934 मध्ये तिच्या स्थापनेपासून आणि त्यानंतर भारत सरकारच्या अखत्यारित 1960 पासून केलेली सेवा, असा एमडीएलचा 250 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास म्हणजे चिकाटी, वृद्धी आणि शाश्वत वारसा यांचा दाखला आहे.

अतिशय महत्त्वाचा हा प्रसंग साजरा करण्यासाठी एमडीएलने आज विविध कार्यक्रमांची एक मालिका आयोजित केली होती. यामध्ये एमपीएकडून गोदीलगत असलेल्या अधिग्रहित जमिनीचे उद्घाटन, अरोवाना या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीचे उद्घाटन, सोलर इलेक्ट्रिक हायब्रिड बोटीचे जलावतरण, गोदीला 250 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एमडीएलच्या विशेष नाण्याचे प्रकाशन आणि दिवसभर चालणाऱ्या तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन या कार्यक्रमांचा समावेश होता. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. मुंबई बंदर प्राधिकरणाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या गोदीलगत असलेल्या भूखंडाचे संरक्षण सचिवांनी औपचारिकपणे उद्घाटन केले. नवीन जहाजांची एकाच वेळी बांधणी आणि त्यावरील सामग्रीची उभारणी , विविध प्रकारच्या जहाजांची दुरुस्ती आणि उपकरणे बसवणे या कामांसाठी ही सुविधा वापरली जाणार आहे. या नव्या पायाभूत सुविधेमुळे विविध प्रकल्पांची एकाच वेळी अंमलबजावणी करण्यासाठी एमडीएलला पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे.

एमडीएलने अरोवाना नावाच्या लहान आकाराच्या(Midget) पाणबुडीच्या प्लॅटफॉर्मची रचना आणि हल पूर्ण करण्यात यश मिळवले आहे, जिचे आज संरक्षण सचिवांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 1984 पासून एमडीएल परदेशी डिझाईनच्या पाणबुड्यांची उभारणी करत आहे. मात्र एमडीएलने स्वदेशी बनावटीच्या पारंपरिक पाणबुड्यांची रचना आणि विकास देखील सुरू केला आहे. Midget पाणबुडी ही संकल्पनेचा दाखला म्हणून विकसित केली जात आहे. ही पाणबुडी तयार करणारा चमू 2028 पर्यंत एका पूर्ण क्षमतेच्या पारंपरिक पाणबुडीची रचना करण्यासाठी समांतर काम करत आहे.

संरक्षण सचिवांनी सोलर इलेक्ट्रिक हायब्रिड बोटीचे देखील जलावतरण केले. या बोटीचा सर्वाधिक वेग 11 नॉट असून, स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान असलेल्या भागीदाराच्या मदतीने तिची रचना आणि विकास करण्यात आला आहे. तिचा वापराचा खर्च डिझेल बोटीच्या 1/10 आहे आणि देखभालीचा खर्च देखील अत्यल्प आहे. या व्यतिरिक्त एमडीएलने संकल्पना मांडलेल्या आणि स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान असलेल्या भागीदाराच्या मदतीने सह-विकास केलेल्या सूची नावाच्या 24 पॅक्स फ्युएल सेल इलेक्ट्रिक फेरीचे देखील संरक्षण सचिवांनी जलावतरण केले. तिच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये शून्य उत्सर्जन, स्वच्छ जलमार्गाला प्रोत्साहन आणि पर्यावरण संवर्धनामध्ये योगदान यांचा समावेश आहे.

अरमाने यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि जहाजबांधणीचे भवितव्य या विषयावरील तांत्रिक चर्चासत्राचे देखील उद्घाटन केले. एमडीएलच्या अस्तित्वाला 250 वर्षे पूर्ण होण्याची आठवण ठेवण्यासाठी, एमडीएलचा समृद्ध इतिहास आणि वृद्धिंगत होणारा वारसा यांचा सन्मान करण्यासाठी आरबीआयने जारी केलेल्या स्मृती नाण्याचे देखील संरक्षण सचिवांनी प्रकाशन केले. एमडीएल हे भारताच्या शिरपेचातील एक मौल्यवान रत्न आहे आणि नौदल आणि व्यावसायिक वापरासाठी जहाजबांधणीच्या क्षमता उभारणीमध्ये या संस्थेने मोठे योगदान दिले आहे, अशा शब्दात संरक्षण सचिवांनी एमडीएलची प्रशंसा केली. एमडीएल ही देशातील सर्वात मोठी जहाजबांधणी करणारी गोदी आहे आणि भारतीय नौदलाच्या बहुतेक सामग्रीमध्ये योगदान देत आहे, असे ते म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »