नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण रेल्वे स्थानक परिसरात झोपलेल्या प्रवाशांचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले आहे .कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्काय वॉकवर प्रवाशी झोपले असता एका शिक्षकाची बॅग चोरीला गेले होती . या बॅगेत फिर्यादी शिक्षक याचे काही महत्त्वाच्या कागदपत्र आणि महागडा लॅपटॉप होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदी नुसार अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांची ओळख पटवली आहे. हे चोर आंबिवली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचत या चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.या चोरट्याकडून चोरी केलेला लॅपटॉप व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच दुसऱ्या घटनेत एका प्रवाशाचे मोबाईल चोरीला गेला होता. याचा तपास करत रेल्वे पोलिसांनी या तरुणाला मुरबाडहून अटक केली आहे. हे दोघे सराईत चोरटे आहेत. या दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिस पुढील तपास करत आहेत .



