महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मुंबई लोकप्रिय बातम्या

भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो कोच मुंबईत दाखल

प्रतिनिधी.

मुंबई – भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातील तीन ते चार वर्षे मुंबईसाठी विशेष असतील. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मेट्रो मार्गिका ७ व २ (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो कोचचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उद्घाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, कपिल पाटील, विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मुंबईचा विस्तार होतोय. मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईला नियोजनबद्ध आखीवरेखीव स्वरूप देत आहोत. आजचा दिवस मुंबईसाठी वैशिष्ट्यपूर्ण असून या शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.कोरोना काळात मुंबईची लोकल सेवा बंद होती. ती १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करणे आणि गर्दी होणार याची दक्षता घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

लोकलला मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण कमी होणार आहे. आज मुंबईत मेट्रोची जेवढी कामे सुरू आहेत तेवढी जगात कुठेही सुरू नसतील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. कुठल्याही विकासकामांना थांबवले नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती देताना जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचं काम सरकार करीत असल्याने हे लोकाभिमुख सरकार असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मार्गावर मेट्रो चाचण्यांना सुरुवात होणार असून 4 महिन्यात या मार्गावर मेट्रो धावू लागतील.

35 किमीचा हा मेट्रो मार्ग असून त्याद्वारे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील 13 लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गावर मे 2021 पर्यंत सेवा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. 2026 पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणतः 2031 पर्यंत 1 कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील असा अंदाज असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते ट्रॅव्हल कार्ड, ब्रँडिंग मॅन्युअलचे अनावरण तर ग्रहण उपकेंद्राचे बटन दाबून उदघाटन करण्यात आले. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रास्ताविक केले.या दोन्ही मेट्रो मार्गावर नियंत्रण ठेवणे आणि एकात्मिक कृतींसाठी चारकोप आगार विकसित केले आहे. मेट्रो चाचणी मार्चपासून सुरू होईल आणि ती पुढे महिनाभर सुरू राहील. त्यानंतर मेपासून मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज सुरू होईल.

  • चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता
  • ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम
  • प्रत्येक बाजूला चार दरवाजे असलेली स्टेनलेस स्टील बॉडी.
  • विकसित देशातील शहरांप्रमाणे या नवीन कोचमधून प्रवाशांना त्यांच्या सायकलसह प्रवास करता येऊ शकेल.

मेट्रो लाईन २ ए आणि लाइन ७ हे दोन्ही मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण आहेत, कारण यामुळे अंधेरी आणि दहिसर दरम्यान मेट्रो प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून त्यामुळे उपनगरीय लोकल गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे.

मेट्रो लाइन २ ए : दहिसर पूर्व ते डीएन नगरला जोडणाऱ्या १८.५ किमी लांबीच्या मेट्रो लाईन २ ए च्या बांधकामासाठी ६,४१० कोटी रुपये खर्च होत आहे. यात आनंद नगर, रुषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्री नगर आणिडीएन नगरही १६ स्थानके असतील.

मेट्रो लाइन ७ : अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडणारी १६.४७५किमी लांबीची मेट्रो लाइन ७ ही ६.२०८ कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे. यामध्ये दहिसर (पूर्व). ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व) अशी १३ स्थानके असतील.

Related Posts
Translate »