महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मुंबई लोकप्रिय बातम्या

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयामार्फत रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिनिधी.

मुंबई – नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. राज्यात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाने सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिर राबवण्याचा निर्णय घेतला

यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे, उपनियंत्रक शिधावाटप ज्ञानेश्वर जवंजाळ,उपनियंत्रक शिधावाटप मनोहर कडवे, निरीक्षक किरण जामसांडेकर, निरीक्षक किरण सुर्वे, कल्याणी देसाई, सलमा खान, संदीप केणी हे उपस्थित होते.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी रक्तदान शिबिराची पाहणी केली व रक्तदान करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्याशी संवाद साधत विचारपूस केली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवडा भरून काढण्यासाठी सुरू केलेल्या ह्या उपक्रमाला श्री.भुजबळ यांनी  शुभेच्छा दिल्या.

यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा श्री. कैलास पगारे यांनी देखील रक्तदान केले. रक्तदान केलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना श्री. भुजबळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले.

Related Posts
Translate »