DESK MARATHI NEWS NETWORK,
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवत आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती त्यांनी केली आहे.
नरेंद्र पवार हे भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावरही कार्यरत होते. त्यांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिल्याने कल्याणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आपल्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे खोटे असून आपली बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा नरेंद्र पवार यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी आपण पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.



