DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे, फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वराज्य दहीकाला उत्सव २०२६’ मध्ये यंदा नारीशक्तीला विशेष मान देण्यात आला. दहीहंडी महोत्सवातील पहिला मान महिला शक्तीला देत निर्मल युथ फाऊंडेशनच्या महिला गोविंदांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
महिला सक्षमीकरण आणि नारीशक्तीचा सन्मान हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘अमली पदार्थमुक्त भारत’ या जनजागृती मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रमुख उपस्थित होते. युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
- September 5, 2026



