महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

पत्रकारिता क्षेत्रात ज्ञानवृद्धी व संवाद साधण्यासाठी ठाण्यात भरली “पत्रकारितेची पाठशाळा

DESK MARATHI NEWS.

ठाणे/प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, नवी मुंबई प्रेस क्लब, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने “पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट” या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ही कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडली. पत्रकारिता क्षेत्रात ज्ञानवृद्धी व संवाद साधण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि दै.ठाणे वैभवचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यशाळेस ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलास म्हापदी, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक सोनावणे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रफुल वाघोले, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्य प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये ऑर्गोनॉमिक्स प्रोग्राम मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि प्रेरणादायी वक्त्या डॉ. मोना पंकज यांनी दैनंदिन कामकाज आणि ताणतणाव व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक आणि “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी शासनाच्या विविध योजना, प्रसारमाध्यमे व शासकीय अधिकाऱ्यांची परस्परपूरक भूमिका, कर्तव्य व जबाबदारी याविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी पर्यावरण संवर्धन आणि पत्रकारिता याची सांगड कशाप्रकारे घालता येवू शकेल याविषयीचे मार्गदर्शन केले.प्रास्ताविक भाषणात, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी अधिस्वीकृती पत्रिकेबाबत थोडक्यात माहिती देत, शासन निर्णयानुसार सर्व पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावेत. तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन केले.

उपायुक्त उमेश बिरारी यांनी अशा कार्यशाळा पत्रकारांना नव्या दृष्टीकोनात विचार करण्यास प्रेरणा देतात, असे सांगून सर्व पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.कैलास म्हापदी यांनी त्यांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन करीत बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनांबाबत माहिती दिली. पात्र पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.संजय पितळे यांनी शासनाकडून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या लाभांच्या अटी सुलभ करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से.), ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव (भा.प्र.से.), माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह (भा.पो.से.), संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (माध्यम आराखडा) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.गणेश मुळे, कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक (माहिती) अर्चना शंभरकर, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार, संपादक, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्र, प्रश्नोत्तरे आणि अनुभव कथनाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ही कार्यशाळा पत्रकारांसाठी केवळ माहितीपर नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातून व शासन-प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील सकारात्मक संबंध वृद्धिंगत होण्यास उपयुक्त ठरली. पत्रकारितेतील नव्या वाटा शोधण्यासाठी ही “पाठशाळा” महत्त्वपूर्ण ठरली, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »