DESK MARATHI NEWS.
कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट- “क” व गट- “ड” मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरातीनुसार गट “क” व गट-“ड” मधील एकूण ४९० पर्दाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि.१०/०६/२०२५ पासून दि. ०३/०७/२०२५ रोजीपर्यंत होता. अर्ज भरण्याचा कालावधी वाढ करावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगर पालिका पद भरतील १५ जुलै पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे.
त्यामुळे आता सरळसेवेत अर्ज भरण्याचा कालावधी १५/०७/२०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना कालावधी वाढल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर ज्या इच्छूक उमेदवारांना वेळे अभावी पद भरातीचा अर्ज भरता आला नाही त्यांना पुनः ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.



