महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स महत्वाच्या बातम्या

नोकरीचे आमिष दाखवून कल्याणात अल्पवयीन मुलीला ढकलले देहव्यापारात

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – गरीब घरातील तरूणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून तसेच त्यांचा विश्वास जिंकून अशा मुलींना देहव्यापारात ढकलले जाते. देहव्यापारासारखी गोष्ट समाजासाठी एक श्राप आहे. ज्यात व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्याचा एखाद्या वस्तूप्रमाणे वापर केला जातो. बांग्लादेशातील अशाच एका लाचार मुलीला नोकरीचे आमिष दाखवून कल्याणात आणले गेले.

डोंबिवली पूर्व येथील पलावा परिसरात राहणारा सतीश रजत याचा चार महिन्याचा मुलगा अचानक घरामधून गायब झाला. या संदर्भात मुलाचे वडील सतीश रजत यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ ,एसीपी सुनील कुऱ्हाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादभाने यांच्या नेतृत्वात मुलाचा शोध सुरू झाला. पोलिसांना माहिती मिळाली की सतीशच्या घरात काम करणारी मोलकरीण यांनी चार महिन्याच्या मुलाचे अपहरण केले आहे. मानपाडा पोलिसांनी सदर मोलकरणीला शोधून काढले. ती अल्पवयीन होती, तिला ताब्यात घेत चार महिन्याच्या मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला मात्र जेव्हा पोलिसांनी अल्पवयीन मुलीची विचारपूस केली असता, तिने जे सांगितले ते ऐकून पोलीस देखील हैराण झाले.

https://youtu.be/oPexnOCS-9k?si=gacWvg2gNgq_Iy2D

दोन महिन्यापूर्वी गारमेंट मध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी ,तिची आई आणि मावशीला बांग्लादेशातून डोंबिवलीला आणले आणि अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले. एवढेच नाही तर,आरोपी पीडित मुलीला, तिच्या आई आणि मावशीला भेटू देत नव्हते. या गोष्टीचा राग आल्यामुळे पीडित मुलीने आरोपीच्या चार महिन्याच्या मुलाचे अपहरण केले.

अल्पवयीन मुलगी ही मुळची बांग्लादेशी आहे. अपहरण झालेल्या चार महिन्याच्या मुलाचे वडील सतीश रजक यांनी दोन महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीच्या आईला आणि मावशीला हे सांगून डोंबिवलीत आणले की, तो तिला एका गारमेंट कंपनीमध्ये कामाला लावणार आहे. पण सतीश यांनी असे न करता अल्पवयीन मुलीला देह व्यापार करायला भाग पाडले. दोन महिन्यांपासून ही मुलगी देह व्यवसायाचे काम करीत होती. एवढेच नाही तर,सतीश तिच्याकडून घरकाम देखील करून घेत होता. मुलीला तिच्या आई आणि मावशी यांना भेटू देत नव्हता. याचा राग काढण्यासाठी पीडितेने सतीशच्या चार महिन्याच्या मुलाचे अपहरण केले होते.

पीडित मुलीला बांगला सोडून कोणतीही भाषा येत नाही. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सतीश रजत आणि त्याचा चुलत भाऊ सचिन रजत या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे.

Related Posts
Translate »