महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखच्या सीमेवर हॉटस्प्रिंग या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान गस्त करीत असतांना तेथे लपून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्या लढाईमध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करतांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १० शूर जवानांनी हौतात्म्य पत्करले. तेव्हा पासून २१ ऑक्टोंबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस” म्हणून पाळला जातो.

या दिवशी देशभरातील सर्व राज्यातील पोलिस मुख्यालयाच्या ठिकाणी विशेष संचलनाचे आयोजन केले जाते.
त्याचप्रमाणे ठाण्यात देखील आज गेल्या वर्षभराच्या काळात आपले कर्तव्य बजावत असतांना धारातिर्थी पडलेल्या पोलिस अधिकारी व जवानांना श्रध्दांजली अर्पण केली जाते. दि.०१/०९/२०२२ ते दि. ३१/०८/२०२३ या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलातील १८८ अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असतांना हौतात्म्य पत्करले आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी ठाण्यात सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली .

या दिवशी आम्ही सर्व शहीद जवानाचा आदर करतो त्यांच्या बलिदानाचा सम्मान करतो. यादिवशी पोलीस शहीद जवानांना विशेष परेड चे आयोजन करून श्रद्धांजली वाहतो असे यावेळी ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांनी सागितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »