नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही मागील एका आठवड्यात तीन खुनाच्या घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा अंबड पोलीस ठाणे हद्दीत जुने सिडको परिसरात संदीप आठवले या बावीस वर्षे भाजीविक्रेत्या युवकाचा निर्गुण खून करण्यात आला आहे.
दरम्यान मृत संदीपच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली असून जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने व्रताचे नातेवाईक जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Related Posts



