महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

दुर्गम भागातील दोदराज येथे पोलीस जवानांच्या सोबत पालकमंत्री यांनी दिपावली सण केला साजरा

गडचिरोली/प्रतिनिधी – राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात जंगली हत्तींना संरक्षित जंगल मिळवून देण्यासाठी चपराळा येथील अभयारण्याची पाहणी वन विभागातील अधिकाऱ्यांसह केली. गडचिरोली जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य वाढले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का याबाबत पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे पालकमंत्री शिंदे यांना हत्तींबाबत, त्याच्या नैसर्गिक निवासाबाबत व जागा तयार करावयाची असल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत सादरीकरण उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांनी केले. मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांनी यावेळी हत्तींबाबतची सद्यस्थिती सांगितली. भेटीत जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी भामरागड येथील दुर्गम भागातील दोदराज पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथील जवानांना दिपावली पुर्व शुभेच्छा दिल्या. नक्षली कारवायांना रोखण्यासाठी घरापासून दूर सणवार सोडून सेवा बजावणाऱ्या जवानांना त्यांनी शुभेच्छा दिल्या व दिवाळीचा फराळही केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »