दौंड-प्रतिनिधी-काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावात चार-चार बिबट्यांचे समुहाने दर्शन झाले होते.तालुक्यातील उंडवडी सौंदडवाडी परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा मुक्त संचार दिसून येतोय. शहरी वस्तीपासून दूर जंगलभागात दिसणारा बिबट्या आता भर लोकवस्तीत दिसू लागल्याने नागरिक भयभीत झालेत.
उंडवडी गावच्या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर होत होता. दोन दिवसापूर्वी सौंदडवाडी येथील हरपळे-ढोरे फार्म येथील फार्म हाऊस वर रात्रीच्या वेळी कुत्र्यांवर हल्ला केला होता. दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विष्णु गवळी आणि अमित गवळी हे शेतात काम करत असताना अचानक त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. भयभीत झालेले गवळी यांनी सरपंच दिपमाला जाधव यांना फोनवरून हि माहिती दिली. गावचे मा.सरपंच सचिन गुंड व तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून वनविभागाचे अधिकारी चव्हाण यांना फोनवरून घडलेल्या घटनेची माहिती देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली. त्याअनुषंगाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे पाहता बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असल्यांचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी उंडवडी-सौंदडवाडी परिसरात बिबट्या येणे ही गंभीर बाब असून उसाच्या क्षेत्रात बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करून संरक्षित जंगलात नेण्यात येईल जनतेने घाबरून जाऊ नये असे वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी सांगितले.
- May 9, 2021
दौंड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर,नागरिकात भितीचे वातावरण
Related Post
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



